नुपूर शर्मा प्रकरणा मुळे भारतावर सायबर हल्ला, ठाणे पोलिसांची वेबसाईट झाली हॅक
भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहे, मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश ठाणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवरून देण्यात आला. हा प्रकार हॅकर्स मुळे घडला.
राज्यात 37,000 क्विंटल सोयाबीन बियाणे चाचणीत फेल
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या ग्रुपने ‘opspatuk’ हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ; पुढील दीड वर्षांत 10 लाख लोकांना नोकऱ्या
सध्या या वेबसाईड वर हॅकर्सने केलेल्या हल्ल्या मुळे पोलिसांनी दुरुस्तीचे काम सुरु केले आहे, आता जर तुम्ही वेबसाईटवर जाल तर वेबसाईट अंडर मेन्टेन्स असा संदेश लिहून येईल. नुपूर शर्मा प्रकरण मुळे अनेक मुस्लीम राष्ट्र भारताचा निषेध करत आहे. तसेच भारतात देखील या घटनेमुळे हिंसाचार पाहायला मिळालं, दरम्यान नुकर शर्माला भाजपने ६ वर्षासाठी पक्षातून बाहेर काढले आहे.