क्राईम बिटमहाराष्ट्र

पुणे ग्रामीण भागात ११ तरुण बिष्णोई गॅंगचे सदस्य, संतोष जाधवने दिली धक्कादायक माहिती

Share Now

सध्या देशभरात सिद्धू मुसेवाला खून प्रकरण मुळे लॉरेन्स बिष्णोई गॅंग सर्वत्र चर्चेत आहे. देशभरातील अनेक तरुण या गुनेहगारांच्या लाईफस्टाईलला मोहित होऊन गुन्हेगारीकडे वळतात. तसेच या गॅंग मध्ये देखील सामील होतात. लॉरेन्स, गोल्डी अश्या गॅंग सध्या तरुणाईला मोहित करत आहे.

मुसावाला प्रकरणातील शुटर संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात

त्याच प्रमाणे कश्यप गॅंग सुद्धा तरुणाईला गुन्हेगारी मार्गावर ओढत आहे. औरंगाबादेत कश्यपचे अनुकरण करून दहशत करणारे गुंड काही महिन्यात पूर्वी पोलिसांनी जेरबंद केले. याच प्रमाणे आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, पुण्यात तब्बल ११ तरुण लॉरेन्स बिष्णोई गॅंगचे सदस्य आहेत अशी माहिती समोर येत आहे.

एकदाच लावा हि झाडे: तमालपत्राच्या लागवडीतून कमी खर्चात आयुष्यभर बंपर कमाई, शासन अनुदानही देते

लॉरेन्स बिष्णोई टोळीचे हस्तक महाराष्ट्रतही पसरलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे. इतकंच काय तर त्याहून धक्कादायक म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं समजतंय. त्यामुळे आता या 11 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे. संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.. पोलिसांनी जाधवच्या टोळीतील आणखी एकाला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *