केबिनेट मंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर भररस्त्यात केले ‘हे’ कृत्य
राष्ट्रीय राजधानीत 23 वर्षीय महिलेवर शाईने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या महिलेनेच राजस्थानचे कॅबिनेट मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला आहे. डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की शनिवारी रात्री पीसीआर कॉल आला की काही बदमाशांनी महिलेवर काहीतरी फेकले आणि पळून गेले.
हल्ल्यानंतर महिलेला तातडीने एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती रात्री 9.30 च्या सुमारास कालिंदी कुंज रोडजवळ तिच्या आईसोबत पायी जात होती. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने या घटनेबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून या घटनेबाबत संपूर्ण कारवाईचा अहवाल मागवला आहे.
मंत्र्यांच्या मुलावर हे आरोप
वास्तविक, यापूर्वी पीडितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात राजस्थानचे कॅबिनेट मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.
डीसीपी सागर सिंग कलसी म्हणाले, “तिने आरोप केला होता की रोहित जोशी २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिच्या संपर्कात आला होता. तो तिला ८ जानेवारी २०२१ रोजी सवाई माधोपूरला घेऊन गेला. तिला नशा देण्यात आली आणि तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले. ”
जयपूर आणि इतर ठिकाणीही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी 8 मे रोजी आयपीसीच्या कलम 376, 377, 328, 366, 312, 506 आणि 509 अंतर्गत शून्य एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, त्या शाई हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावणार आहेत. मालीवाल यांनी तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना त्यांच्या मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांना अटक करा, असे सांगितले.