मोदींसाठी देहू संस्थानाकडून हि ‘खास’ पगडी, काय आहे वैशिष्ट्य पहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार असून. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत तयारी सुरू आहे. तसेच पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थानकडून तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. त्यात एक विशेष पगडीचा समावेश आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ तारखेच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येईल.
Nano DAP: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, युरियानंतर आता DAP मिळणार बाटलीत
गेल्या तीन- चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करत असल्याची माहिती गिरीश मुरुडकर यांनी दिली. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. बदामी रंगाच्या रेशमी वस्त्राची तुळशीच्या मण्यांचा वापर करून ही पगडी बांधण्यात आली असून. पगडीच्या मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
सिद्धू मुसावाला प्रकरणात धक्कादायक माहिती, पुण्यातील सौरभ महाकालने केला मोठा खुलासा
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हा अभंग पगडीवर रेखाटला आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील. सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतिके ठेवण्यात आली आहेत. उपरण्यावर दोन्ही बाजूला तुकाराम महाराजांचा मराठी आणि हिंदी अभंग कोरण्यात आले आहे.
येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.