सिद्धू मुसावाला प्रकरणात धक्कादायक माहिती, पुण्यातील सौरभ महाकालने केला मोठा खुलासा
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं होत. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली होती. आरोपी संतोष जाधव, सौरव उर्फ महाकाल या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली होते. यातील सौरव उर्फ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे.
महाकालचे खरे नाव सितेश हिरामण कमळे असे आहे. या प्रकरणी सितेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाल, ” मी या खुनात सहभागी नव्हतो, माझे आणि संतोष जाधवचे चांगले संबंध आहे. तो या खुनात सभागी होता. संतोष जाधव आणि मी अनेक गुन्हे सोबत केले आहे”. हि माहितीला स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दिली.
हेही वाचा :
- ऐकावे ते नवल ! पाकिस्तानात रात्री १० नंतर लग्नाला बंदी, कारण…
- भारत लवकरच 1.2 दशलक्ष टन गव्हाच्या निर्यातीला मान्यता देणार ?
दरम्यान, पुण्यातील नारायणगाव येथून लोकल क्राईम ब्रांचने आरोपी सितेश हिरामण कमळे याला अटक केली आहे. पुण्यातील एका कुख्यात गुंडाच्या हत्या प्रकरणी त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता त्यावरून पुणे ग्रामिणी पोलिसांना २० जून पर्यंत त्याची कोठडी देण्यात अली आहे. मुसेवाल प्रकरणातील संतोष जाधव याचा शोध पोलीस घेत असताना सौरव उर्फ महाकाल याची माहिती त्यांना मिळाली आणि पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे.
दरम्यान, दरम्यान, मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.