पत्नीला सरकारी नौकरी लागली म्हणून पतीने तिचा हात कापला
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्याच्या बातमीने पती इतका संतप्त झाला की पतीने मोठा वाद सुरू केला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. घटनेनंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम मध्ये घडले. पतीला पत्नीची प्रगती सहन होत नव्हती असा अंदाज यामध्ये वर्तवला जात आहे.
रेल्वेने दिली प्रवाशांना ‘हि’ उत्तम सुविधा
मिळालेल्या माहितीनुसार, रेणू खातून नावाच्या महिलेला सरकारी रुग्णालयात नर्सची नोकरी लागली. मात्र पती मोहम्मद शेख पत्नीच्या नोकरी लागली म्हणून नाराज होता. नोकरी मिळाल्यास पत्नी आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती त्याला वाटत होती. ती मला सोडून दुसरे लग्न करेल. यामध्येही मित्रांनी आगीत तेल ओतण्याचे काम केल्याने चिथावणीखोर मोहम्मद शेख हा अधिक पेटून उठला.
(नोंदणी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022: नवीन ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती
पीडितेने सांगितली की, रात्री 10 वाजता झोपल्यानंतर मी झोपी गेली आणि अचानक रात्री दोन वाजता माझे डोळे उघडले. माझे पती वारंवार वॉशरूममध्ये जात असल्याचे मला दिसले. मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की माझ्या पोटात दुखत आहे. काही वेळाने उशी तोंडावर ठेवून हातावर कात्री मारली. यावेळी त्याच्यासोबत आणखी तीन लोक होते. सर्व कागदपत्रे घेऊन ते पळून गेले. त्यानंतर मला रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपस पोलीस करत आहे.