रेल्वेने दिली प्रवाशांना ‘हि’ उत्तम सुविधा
रेल्वेने तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल केला असून. या नवीन नियमामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने उत्कृट सुविधा उपलब्ध करून दिली. प्रवासी आता महिन्याला दुप्पट तिकीट बुक करू शकणार अशीही सुविधा आहे.
हेही वाचा : दिल्ली पोलिसांकडून नुपूर शर्मा यांना सुरक्षा
एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी ज्यांचे लॉगिन आयडी आधारशी लिंक केलेले नाही. त्यांची संख्या ६ होती ती आता ६ वरून १२ करण्यात आली . तसेच आधार लिंक युजर आयडी असलेल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त तिकीट बुक संख्या १२ वरून २४ करण्यात आली. जे लोक वारंवार ये-जा करतात,त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा : (नोंदणी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022: नवीन ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती
या निर्णयावर बोलताना रेल्वे अधिकारी म्हणाले, “रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने जास्त प्रवास करणा-यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी एका खात्यातून तिकीट बुक करणा-यांनाही याचा लाभ मिळणार आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे नेहमी करत असते. रेल्वेने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली आहे. १३९ हा क्रमांक इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित एक हेल्पलाइन क्रमांक आहे. यामध्ये अनेक भाषांमध्ये माहिती दिली जाते. यासोबतच सुरक्षा, वैद्यकीय मदत, अपघाताच्या माहितीसाठी १ नंबर डायल करावा लागेल.”