औरंगाबादेत हत्येचे सत्र सुरूच, बहिणीला त्रास देणाऱ्या भावोजीला मेहुण्याने संपवले

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून. औरंगाबाद जिल्ह्यात एका मुलाने आईवडिलांचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे.

हेही वाचा : वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ‘त्या’ आतंकवाद्याला फाशीची शिक्षा

बहिणीला सतत त्रास देणाऱ्या भावोजीची मेहुण्यानेच हत्या केल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. हिमायतबाग परिसरात डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या मृतदेहासंदर्भात चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. रविवारी एक मृतदेह पोलिसांनी जळालेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर तपास करत अवघ्या एक दिवसात आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुधाकर नारायण चिपटे (43, रा. सांगले कॉलनी) असे मृताचे नाव आहे. तर राजेश संतोष मोळवडे, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : सोयाबीनचे पाच प्रमुख रोग आणि त्यांचे नियोजन

मृत सुधाकर चिपटे याला दारुचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन आपल्या पत्नीशी वाद घालायचा. तिला मारहाणही करायचा. या सर्व प्रकाराला त्याची पत्नी अक्षरश: कंटाळली होती. दरम्यान, या महिलेचा भाऊ राजेश मोळवडे हा सहा महिन्यांपूर्वीच आपल्या बहिणीच्या घराच्या शेजारीच राहायला आला होता. खासगी वाहनावर चालक असलेल्या भावोजीकडून बहिणीला सतत होणाऱ्या मारहाणीमुळे राजेश मोळवडे याला प्रचंड राग येत होता. त्यामुळे त्याने आपल्या भावोजीला संपवण्याचाच निर्णय घेतला. यानंतर त्याने शनिवारी घरी कुणीच नसल्याची संधी साधली आणि सुधाकर याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आधी सुधाकरचा मृतदेह एका पांढऱ्या गोणीत टाकला. त्यानतंर तो मृतदेह घेऊन हिमायतबाग येथे गेला. यानंतर ती गोणीत असलेला मृतदेह गोणीसह पेटवून दिला. मात्र, ही घटना जिथे घडली तिथे जवळच एक फार्म हाऊस आहे. येथील एक कामगार रात्री दीडवाजेच्या सुमारास लघुशंकेला उठला असता त्याला आग लागल्याचे दिसले. यानंतर ही घटना समोर आली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात एक व्यक्ती त्यांना दिसला. या व्यक्तिची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान, भावोजीकडून बहिणीला सतत मारहाण होत होती. यामुळे मेहुण्यानेच भावोजीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *