सिद्धू मुसेवाला हत्याकांड, शार्प शुटरची ओळख पटली
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली, पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हि हत्या झाली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून. शुक्रवारी त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील आला, तसेच मुसेवला यांच्या मारेकर्यांची ओळख देखील पटली आहे.
हेही वाचा : काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ले सुरूच, ग्रेनेड हल्यात २ मजूर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांना गोळी मारणारे संशयित आरोपी सोनिपतमधील रहिवासी आहेत. प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा यांची नावं समोर येत आहेत. या दोन्ही आरोपींची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. यामध्ये हे दोघे पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहेत.
हेही वाचा :
विद्यापीठात आढळला झाडाला लटकलेल्या अवस्तेत मृतदेह |
फतेहाबादमधील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा हे दोघेही शार्प शूटर सोनीपतचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात पोलिसांकडून जलद गतीनं तपास सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी दोघे संशयित आरोपी फतेहाबादच्या बिसला गावातील पेट्रोल पंपावर पोहोचले होते.
हेही वाचा : कांद्याच्या सततच्या घसरणीमुळे शेतकरी नाराज, नाराज होऊन म्हणाले- आता शेती करणार नाही
दरम्यान, अंकित सेरसा या विरोधात सोनपत पोलिसांकडे कोणताही गुन्ह्याचा इतिहास नाही. प्रियव्रत फौजी हा देखील रामकरण टोळीचा शार्प शूटर आहे. त्याच्यावर दोन खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हल्ल्याच्या वेळी मारेकरी बोलेरोमध्ये होते, असं सांगितलं जात आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी कॅनडामध्ये बसलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळ्यांचीही नावं समोर आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रारने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.