क्राईम बिट

औरंगाबाद शहरात खुनाची मालिका सुरुच पुंडलीकनगरात पती-पत्नीची हत्या

Share Now

[lock][/lock]पुंडलिकनगर येथे कुजलेल्या अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. या दाम्पत्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुंडलिक नगर येथे राहणारे पती शामसुंदर कलंत्री (वय ५५), पत्नी किरण कलंत्री (वय ४५) यांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर हत्या त्यांच्या मुलाने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांचे मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले असून हत्या केल्यानंतर दोन्ही मृतदेहांना घराच्या वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह पलंगाखा लपवून ठेवलेले आढळले. हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत पुंडलिकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. –

मृत शामसुंदर कळंत्री यांची किरण कळंत्री ही दुसरी पत्नी होती. गजानगरमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलगा व मुलगीसोबत राहत होते. मुलीने दिलेल्या माहितीनूसार शनिवारी शामसुंदर यांनी तिला एसबी कॉजेलमध्ये सोडले होते. नंतर दुपारी आपण गावी जाणार असल्याचे सांगत वडीलांनी आपल्याला काकांच्या घरी जाण्यास फोन करुन सांगितले. त्यामुळे आपण कॉलेजनंतर काकांच्या घरी गेलो, असे मुलीने सांगितले आहे. मात्र, या घटनेनंतर शामसुंदर यांचा मुलगा आकाश कळंत्री फरार झाला आहे. तसेच, मुलीला त्यानेच वडीलांच्या नावाने फोन केल्याचा संशय आहे. त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस अधिक तपास आहेत.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या हत्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या हत्येने शहरात संताप व्यक्त असतानाच पती पत्नीच्या हत्येने शहर हादरून गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *