देवगिरी कॉलेजच्या आवारात प्रेम प्रकरणातुन तरुणीचा खून
औरंगबाद :- औरंगाबाद शहरात खुनाचे सूत्र सुरूच , दोन दिवसापूर्वी शहरातील नारेगाव परिसरात १९ वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका निष्पाप तरुणीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
एकतर्फी प्रेम प्रकरणाच्या वादातून एक तरुणाने तरुणीचा खून केल्याची घटना आज दि, २१ मे शनिवारी १२ वाजल्याचा सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
‘त्या’ तरुणीच्या हत्येतील संशयित तरुणाची आत्महत्या ; मांडकी शिवारात घेतला गळफास
देवगिरी महाविद्यालयाच्या आवारात हि घटना घडली आहे, तरुणाने तरुणीला महाविद्यालयाच्या मैदानावर ओढत नेऊन तरुणीच्या गेल्यावर चाकूने वॉर केला ज्यात तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरनातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला नाही, असंच म्हणावं लागेल.
मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थीनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घडली घटना असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.