मराठवाड्यात ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार, मुंबईत कधी ?
देशाच्या इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे . यावेळी मान्सूनचे मुंबईत ६ जून रोजी आगमन होणार आहे. ११ जून रोजी मराठवाडा विभागात येणार आहे. अंदमानमध्ये काल (16 मे, सोमवार) मान्सूनने दस्तक दिली असून वाढत्या उष्णतेमध्ये दिलासा मिळेल.
सुमारे सहा दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाले आहे. आता २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
अंदमानमध्ये मान्सूनचे लवकर आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या लवकर येईल . परिस्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून मुंबईत ६ जूनला तर मराठवाड्यात ११ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी या भागात मान्सूनसाठी १० जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन महिनाभर अगोदरच शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घर बेकायदेशीर नारायण राणेंचा दावा
महाराष्ट्रात पुढील ३ दिवस ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे
दरम्यान, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच केरळच्या किनारी भागात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. १६ ते १९ मे या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हे.
ईशान्येतील ७ राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज
17 मे, 4 pm,जारी करण्यात आलेली नुकतीच चेतावणी :
सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाट व 30-40किमी प्रतितास वेगाचा सोसाट्याच्या वाऱ्यासह,हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता पुढील ३ ते ४ तासांत. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.
-आयएमडी मुंबई— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 17, 2022
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील ७ राज्यांमध्ये पुढील ५ दिवसांत जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने दमट वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने जोरदार वारेही वाहतील.
हेही वाचा :- सेंद्रिय शेती, माहिती संपूर्ण वाचून समजून घ्या आणि शेअर नक्की करा