newsमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात

Share Now

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या अलिशान कारचा चुराडा झाला, मात्र सुदैवाने गाडीतील सर्व एअरबॅग्ज वेळीच उघडल्यामुळे आमदार जगताप यांच्यासह गाडीतून प्रवास करणाऱ्या पाचही जणांचा जीव थोडक्यात बचावला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला असून एसटी चालकाने अचानक गाडी उजवीकडे घेतल्यामुळे बसची धडक संग्राम जगतापांच्या कारला झाली होती.

आमदार संग्राम जगताप आज पहाटेच्या सुमारास नगरहून मुंबईला निघाले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी गावाजवळ रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यासाठी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. पहाटे चार वाजता एक एसटी बस निघाली होती. मात्र अंधारात एसटी चालकाला हे बॅरिकेटिंग लक्षात येण्यास उशीर झाल्यामुळे त्याने अचानक बस उजव्या लेनमध्ये वळवली. त्यामुळे आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला बसची जोरदार धडक झाली .

हेही वाचा :- विकासात राजकारण करू नका, विकासासाठी सर्व समाज बांधवानी एकत्र येण्याची गरज : आ. संजय शिरसाट

एअर बॅग्जमुळे जीवित हानी टळली
कार आणि बसची धडक इतकी भीषण होती की, आमदार जगताप यांच्या आलिशान कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. मात्र अपघात होताच वाहनातील एअर बॅग उघडल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताच्या वेळी वाहनात आमदार संग्राम जगताप, अनुप काळे, चालक आणि मुंबईतील दोन स्वीय सहाय्यक असे पाच जण होते.

ही घटना घडताच आमदार जगताप यांनी कुटुंबाला फोन करुन अपघात झाल्याची माहिती दिली आणि काळजी न करण्यास सांगितलं. जगताप यांनी समर्थकांनाही चिंता न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर संग्राम जगताप सुखरुप मुंबईलाही रवाना झाले .

ही वाचा (Read This) उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे पेय: बनवा लिंबू आणि पुदिन्याचे हे थंड पेय, कसे बनवायचे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *