मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढील सभा पुण्यात
राज्यातील राजकारणात सध्या हिंदुत्व आणि भोंग्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढील सभा पुण्यात होणार आहे. सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागून आहे.
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. २१ ते २८ मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे.
राज ठाकरे यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा घेणार आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. काहींना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय राज ठाकरेंवर टीका करताना त्यांनी मुन्नाभाईचं उदाहरण दिलं. सिनेमातल्या मुन्नाभाईच्या डोक्यात केमिकल लोचा होता, तसंच इथेही झालंय, असं ते म्हणाले. त्यामुळे या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
राज ठाकरे पुण्यात कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं असून ही ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.