मला जनतेसमोर पंचमुखी हनुमान दिसले ; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच तुफान भाषण
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्यभर जात होते. तिथल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला . कोविड काळात जे काम महाराष्ट्रानं केलं त्याचं कौतुक मुंबई, महाराष्ट्र किंवा देशानं नाही तर जगानं केलं त्याचा अभिमान आपल्याला असायला हवा. 2020 चा काळात ८ मार्च रोजी अजित पवार यांनी बजेट सादर केलं. शेतकरी कर्जमाफीनंतरचं हे बजेट होतं. त्यानंतर कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि १५ दिवसात हॉस्पिटल उभं करण्याचे आदेश दिले. आपला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं होता. केंद्रानं अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केला.
मुख्यमंत्री लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन येऊन लोकांना मार्गदर्शन करायचे तेव्हा लोकांना वाटायचं हा कुणी मुख्यमंत्री नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्याशी बोलतोय, असा मुख्यमंत्री असायला हवा. आपण कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न दाखवून दिला.ज्याची दाखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री असतात. त्याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून कौतुक आणि अभिमान आहे.
कोरोना काळातही आपला विकास थांबला नाही. उलट महाविकास आघाडीने शाश्वत विकास दिला. मेट्रोची कामं, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई नागपूर हायवे अशी अनेक कामं सुरु होती आणि आहेत. अर्थचक्र सुरु ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर होतं. पण तरीही आपण विकासकामं थांबवली नाहीत.
बीएमसीची कामं, महाराष्ट्र सरकारची कामं अनेक आहेत. जेव्हा आपल्या राज्यात देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महागाई, बेरोजगारी, समाजात, माणसात भांडण लावलं जातं, अनेकांनी वेगवेगळे रंग हातात धरले आहेत. अशावेळी तुम्ही भांडण लावणाऱ्यांचे सरकार आणणार आहात की चूल पेटवणाऱ्यांचे सरकार आणणार आहात? हे ठरवायला हवं.