Uncategorized

संभाजीराजे छत्रपती अपक्ष राज्यसभेची निवडणूक लढवणार, ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना..

Share Now

संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. येणारी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे . तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार
पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं .

संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज जाहीर केली. संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनती केली कि, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे. म्हणून २०१६ ला मी पद स्वीकारल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्या दोघांचेही संभाजीराजेंनी यावेळी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांवर माझी पुढील वाटचाल असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष इच्छुक होते . कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *