संभाजीराजे येत्या १२ मे रोजी, स्वतःचा पक्ष स्थापन करणार ? ‘कि’ राजकीय पक्षात प्रवेश…
कोल्हापूर :- संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा सदस्य पदाचा कार्यकाळ संपला आहे, यापुढे त्यांची राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या प्रश्नावर त्यांनी आज स्वतः उत्तर दिले असून येत्या १२ मे रोजी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता संभाजीराजे स्वतः पक्ष स्थापन करणार कि, राजकीय पक्षात प्रवेश करणार या प्रश्नच उत्तर येत्या १२ तारखेला मिळेल.
काही दिवसापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांचे स्वागत करू, असे जाहीरपणे सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करू असे म्हणाले आहेत. मात्र आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घरणार हे येत्या १२ मे रोजी स्पष्ट होईल.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकारणात उतरायचंय ते आता निश्चित आहे. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असे पूर्वीच सांगितले होते.
हेही वाचा :- नागरिकांनो काळजी घ्या ..! राज्यातील ‘या’ शहरात पुन्हा उष्णतेची लाट
महाराष्ट्र आणि दिल्लीच दोन्ही राजकारण करणार का ? यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले कि, “दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीकडे मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला हवं . तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या