क्राईम बिट

मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा राग ; जन्मदात्या माय बापाने केला मुलीचा खून

Share Now

सातारा : भावकीतीलच मुलाच्या प्रेमात पडलेल्या १७ वर्षीय मुलीचा जन्मदात्या आईवडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर आरोपीनी मुलीचा मृतदेह डोंगरात पुरला होता. पोलिसांनी पंधरा दिवसानंतर मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा :- काँग्रेस नेते राहुल गांधीचा “पब” मधील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

भावकीतीलच युवक जो नात्याने चुलता लागतो, त्याच्या प्रेमात मुलगी पडली पडली होती. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता . मात्र, ही सोयरीक पसंद नसल्यानेच आई वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

कऱ्हाड जवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे मुलीवर आई वडिलांचा राग होता . त्यांनी मुलीला घेऊन डोंगर परिसरात संपविण्याचा निर्णय घेतला.१७ एप्रिल रोजी त्यांनी समजूत घालण्याच्या बहाण्याने मामाच्या गावाकडे नेले.तिची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला मात्र तरी मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

हेही वाचा :- मोठी बातमी – राज ठाकरेवर औरंगाबादेत गुन्हा दाखल ; १६ पैकी १२ अटींचे सभेत उल्लंघन

संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आई-वडील मुलीला घेऊन डोंगर परिसरात गेले त्याठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून मुलीचा खून केला, आणि
मृतदेह डोंगरांमध्ये काढलेल्या खड्यात पूरला . तसेच दुसऱ्या दिवशी मुलगी कुणाबरोबर पळून गेल्याचे सांगत त्यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

गत पंधरा दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. गावात केलेल्या चौकशीवरून संशय गळा बळावला. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.न्यायालयाने आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा (Read This) Sarkari Naukri 2022: भारत सरकारच्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) नोकरीची सुवर्ण संधी, लवकर अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *