औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन तर्फे आयोजित पेट फॅशन शो सीझन -२ ची विजेती ठरली ज्योती बियाणी यांची बिनी
औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन यांच्या सौजन्याने दिनांक एक मे रोजी प्रोझोन मॉल येथे पेट फॅशन शो सीझन २ आयोजित करण्यात आला होता.
एकूण १०१ स्पर्धकांपैकी प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली श्रीमती ज्योती बियाणी यांच्या व्हील चेअर वर भाग घेतलेल्या भारतीय प्रजातीचे अपंग श्वान बिनी .द्वितीय क्रमांक श्रेयस पवार यांच्या रॉट वीलर
गब्रूने आणि तृतीय क्रमांक नदीम पठाण यांच्या ग्रेटडेन प्रजातीच्या डायनाने पटकावले.
भारतीय प्रजातीच्या श्वानांचे महत्व पटवून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि शहर रेबिज मुक्त करणे हे मुख्य उद्देश असलेल्या औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन च्या संचालिका श्रीमती बेरील सांचिस यांनी अपंग तेही मादी श्वान दत्तक घेवून तिचे उत्तम संगोपन करून तिच्या जगण्याला बळ प्राप्त करून समाजापुढे बियाणी कुटुंबीयांनी एक आदर्श स्थापित केला म्हणून विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला शहरातील श्वान पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. देशी आणि विदेशी श्वानांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि परीक्षक म्हणून एमटीडीसी मुंबई चे जनरल मॅनेजर श्री. चंद्रशेखर जैस्वाल , मा. हर्षदा शिरसाठ आणि श्री.सचिन अनार्थे डायरेक्टर टीएमटी कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रोझोन मॉल च्या सेंटर डायरेक्टर कमल सोनी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन स्थळ उपलब्ध करून दिले आणि भविष्यातील संघटनेच्या अश्या विविध उपक्रमांमध्ये सदैव सहयोगी राहतील अशी हमी दिली.
या फॅशन शो चे प्रायोजक होते पेट हाऊस,हर्षदा शिरसाठ, रेजीना रॉड्रिग्ज, सी. ए. शेरन रॉड्रिग्ज, विवेक भोसले, मेजर सयेदा फिरासत, बाबा टेक्सटाइल, मनीष दंडगवाल, आनंदी इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडप्ले सोल्युशन, डॉ नीरू लोया , किड्स स्माईल नर्सरी, सिटी डेंटल क्लिनिक, फोटो कॉरनर, टीअँडटी जिम, औरंगाबाद फूड एक्सप्लोरर,
जिव्हाळा नर्सिंग होम, शार्दुल गोलंदे , TMT मॅजिक टच प्रोडक्शन, विकास डेव्हलपर्स,अनुजा सारीज , आनंदी इंफ्रास्ट्रक्चर
आणि ड्रीम क्रिएशंस.औरंगाबाद पेट लवर्स असोसीएशन च्या संचालिका बेरील संचिस आणि सभासदांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यााठी अथक प्रयत्न केले.