महाराष्ट्रराजकारण

मनसे अध्यक्ष ठाकरे याच्या सभेनंतर गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक या मुद्दावर होणार चर्चा

Share Now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था तसेच ईद सण असल्याने राज्यातील आढावा घेतला जाणार आहे. दिलीप वळसे पाटील आज रात्री उशिरा बैठक घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील संवेदनशील भागात काळजी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा :- VIDEO| “लाव रे तो व्हीडिओ” म्हणत अंबादास दानवेंचा वेगळ्या शैलीत अमित ठाकरेंना टोला

मंगळवार दि. ३ मे रोजी रमजान ईद आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यात आली नव्हती, मात्र यंदा रंजन ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत भाषण केल्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आजच संध्याकाळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. सध्या ते आपल्या मतदारसंघात आहे. मात्र दुपारनंतर ते मुंबईत परततील. त्यानंतर संपूर्ण राज्यातील संवेदनशील भागांचा आढावा घेणार आहेत. धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा कशाप्रकारे सामना करायचा, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का किंवा त्यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार करण्यात येईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करतील. त्याअनुषंगाने गृहखात्याची पुढील रणनीती असणार, तसंच राज्यभरात ४ तारखेला मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता पाहता कशापद्धतीने हे प्रकरण थांबवता येईल याबाबत बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.
हेही वाचा : गाय आणि म्हशीच्या कानातील ‘आधार कार्ड’ टॅग आहे ! त्याबद्दलचे फायदे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *