राज्यात पुन्हा मास्क सक्ती ? आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं महत्वाचं विधान
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळात कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली . राज्यात मास्क सक्ती केली जाणार अशी चर्चा होती. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यात मास्क वापराच्या सक्तीचा निर्णय झाला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा :- औरंगाबाद शहरातील १५ दिवसातील दुसरी घटना ; भरचौकात गुन्हेगाराला मारहाण
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली . या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे. तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही. मास्कचा वापर न केल्यास दंडही नाही. परंतु नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णाबाबत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली . या बैठकीत मास्क वापवापराबद्दल जनजागृती करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
हेही वाचा :- Blue Aadhar Card: ब्लू आधार कार्ड म्हणजे काय? अर्ज कसा आणि का करायचा जाणून घ्या
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.
हे ही वाचा (Read This) वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यू संख्येत वाढ, अशी घ्या काळजी