औरंगाबाद शहरातील १५ दिवसात दुसरी घटना ; भरचौकात गुन्हेगाराला मारहाण
मागील काही दिवसापूर्वी एका तरुणाला हातपाय बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली होती, त्यात तरुणाचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा समोर आली आहे.
हर्सूल कारागृहातून तीन महिन्यांपूर्वी बाहेर आलेला कुख्यात गुन्हेगार प्रवीण ऊर्फ पन्या सोपान साबळे याला भर चौकात प्रवीण उर्फ पत्या ठेचल्याची घटना सोपान साबळे आंबेडकरनगर चौकात बुधवारी सकाळी ११ वा. घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, कोमात गेला आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.आंबेडकरनगर चौकात कुख्यात गुन्हेगारास मारताना जमलेली बघ्यांची गर्दी.
हेही वाचा :- औरंगाबाद हवाला रॅकेट ; त्या दोन डायरीत कोट्यवधींच्या नोंदी
सिडको पोलिसांनी सांगितले की, पन्यास पोलीस आयुक्तांनी मागील वर्षी एमपीडीएअंतर्गत हर्मूल कारागृहात ठेवले होते. महिन्यांपूर्वी तो बाहेर आला. त्यानंतर, लगेच लूटमार केली. सिडको पोलिसांनी त्याला सासुरवाडीतून पकडले. जामिनावर सुटल्यानंतर तो मुकुंदवाडीत राहत होता. पन्याने एका महिलेला शिवीगाळ केल्याने हे प्रकरण घडले. बुधवारी सकाळी तो आंबेडकरनगर चौकात आला. तीन हल्लेखोरांपैकी दोघांच्या हातात रॉड, एकाच्या हातात चाकू होता, तिघे पयाला भर चौकात मारीत होते.
भर चौकात तिघे पत्यावर तुटून पडले. रॉड, चाकूने मारहाण करीत होते. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची मोठी गर्दी होती. त्यातील कोणीही सोडविण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.
हेही वाचा :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या सभेचा निर्णय आज
तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. माहिती मिळाल्यानंतर, उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास, रतन डोईफोडे घटनास्थळी आले. पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. त्याला रात्री उशिरापर्यंत शुद्ध आलेली नव्हती. पन्याच्या पत्नीने फिर्याद देण्यास नकार दिला.
हे ही वाचा (Read This) वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यू संख्येत वाढ, अशी घ्या काळजी