भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार एल्वेरा ब्रिटो यांचे निधन
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार एल्वेरा ब्रिटो यांचे मंगळवारी वृद्धत्वाशी संबंधित समस्यांमुळे बेंगळुरू येथे निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. तीन लोकप्रिय ब्रिटो बहिणींपैकी (रीटा आणि मेई या इतर दोन बहिणी) सर्वात मोठ्या एल्वेराने 1960 ते 1967 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले आणि तिच्या उपस्थितीत कर्नाटक संघाने या काळात सात राष्ट्रीय विजेतेपदे जिंकली.
एल्वेराने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि जपान विरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 1965 मध्ये, अल्वेरा अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी दुसरी महिला हॉकीपटू ठरली. त्यांच्या आधी अॅन लुम्सडेन (1961) यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एल्वेरानेही तिच्या बहिणींप्रमाणे लग्न केले नाही. एल्वेरा यांच्या निधनाबद्दल हॉकी इंडियाने शोक व्यक्त केला आहे