राणा दाम्पत्याला दिलासा नाही, २९ तारखेला होईल कोर्टाची सुनावणी
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नसून. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने नकार दिला आहे. येत्या २९ तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी ठेवली असून . त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या २९ एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.
हेही वाचा : शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब
येत्या २९ एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याने त्यांना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर वांद्रे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये एकाच दिवसात २ तरुणांच्या आत्महत्या, प्रेम प्रकरणातून घेतला टोकाचा निर्णय?
नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला. वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला असताना पुन्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याची गरज काय? असा सवाल करत माझा या सुनावणीला विरोध आहे, असं प्रदीप घरत यांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना येत्या २९ तारखेपर्यंत आपलं म्हणणं सविस्तर मांडण्याचे आदेश दिले.