औरंगाबादमध्ये एकाच दिवसात २ तरुणांच्या आत्महत्या, प्रेम प्रकरणातून घेतला टोकाचा निर्णय?
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. यातील विद्यार्थिनी फूड टेक्नॉलॉजी तर विद्यार्थी विधि शाखेचे शिक्षण घेत होता. दोन्ही प्रकरणांत दौलताबाद आणि क्रांती होता. चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रोहन झामा पाटील (२४, रा. वडगाव, ता. रावेर, जि. जळगाव, ह.मु. गुरुकृपा बिल्डिंग, समर्थनगर) याने रविवारी रात्री भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रोहनने चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात त्याने माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. त्याशिवाय ‘माझा खूप विश्वास होता. पण माझा विश्वासघात झाला. काय कारण होतं, ते कळलंच नाही. माझं काय चुकलं, ते सांगायचं होतं. शेवटी तुझा निर्णय आहे, पण मरण्याअगोदर एक सांगतो, आयुष्यात तुझं कधीच चांगलं होणार नाही’ असे लिहून ठेवले आहे. रोहन हा एमपी लॉ महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत
दुसरी घटना शरणापूर रेल्वे गेटजवळ रविवारी दुपारी घडली. शेख मसरत रियाजुद्दीन (२२, रा. कुंटूर, ता. नायगाव, जि. नांदेड, ह.मु. प्रिया कॉलनी, पडेगाव) या विद्यार्थिनीने तपोवन एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली. ती मिटमिटा येथील क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च फाउंडेशन महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील शेतकरी असून, दोन बहिणी, दोन भाऊ आहेत. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.