राऊतांची फडणवीसांवर टीका, जिग्नेश मेवानीच्या अटकेवर देखील केले वक्तव्य
मुंबईसह राज्यातील घटना पाहिल्यानंतर, या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय, असं आम्हाला वाटत नाही. जर कुणी हिटलरी प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं अस वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पलटवार केला. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात १७ खून आणि बलात्कार झाले हे मी कालच सांगितल. त्यामुळे हुकूमशाही काय आहे कायदा सुव्यवस्था कोसळणं काय असतं हे आपण उत्तर प्रदेशात पाहिलं पाहिजे, असं सांगतानाच जिग्नेश मेवाणींना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. मेवाणी यांनी मोदींविरोधात ट्विट केलं म्हणून त्यांना अटक केली असून. त्यानंतर त्यांची सुटका झाली. पण अटक करून पुन्हा अटक केली हे कोणतं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये जमावबंदी ; राज ठाकरे यांच्या सभेवर टांगती तलवार
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत असताना. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर केला. न्यायालयावर कसा दबाव आणला, अनेक राज्यात विरोधी पक्ष कसा दबावाखाली आहे, यासह मानवी हक्कासंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे फडणवीस कोणत्या हिटलरशाही विषयी बोलतात हे समजून घ्यावं लागेल. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याला लोकशाहीची चिंता असेल तर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांची भूमिका फक्त महाराष्ट्रापुरती नसून देशाची आहे. संपूर्ण देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे का अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही बोलू त्यांच्याशी, असा चिमटा राऊत यांनी काढला.