राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद :- शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या आमदार निधीतून मराठवाड्यातील ३ हजार ३०० शाळांना १० कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके आज सकाळी १० वा. वितरीत करण्यात येणार आहेत. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील.
विशेष अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहील, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम अध्यक्षस्थानी राहतील. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादा दानवे, माजी आ.अमरसिंह पंडित, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
हेही वाचा :- वकील गुणरत्न सदावर्तेसह ११५ कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर
मुष्टाचा आज मेळावा
– राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे दि. २६ एप्रिलला औरंगाबाद शहरात येत आहेत. पुणे विमानतळावरून खासगी विमानाने ते औरंगाबादकडे रवाना होतील व सकाळी १०-३० वाजता औरंगाबादला पोहोचतील.
– तापडिया मैदानावर आयोजित ‘मुष्टा’च्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते दुपारी २ वा. होईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. सुनिल मगरे, डॉ. सभाजी वाघमारे यांनी केले आहे.
हेही वाचा :- कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार !