क्राईम बिट

राज्यात खुनांचे सत्र सुरूच, बदलापूर येथे तरुणाची हत्या

Share Now

बदलापूर : अज्ञात कारणावरुन एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापुरमधील जुवेली परिसरात उघडकीस आली. प्रसाद जिंजूरके (28) असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून. या हत्येप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसाद जवळच्याच सापेगावमध्ये असलेल्या पोद्दार एव्हरग्रीन सोसायटीत परिवारासह वास्तव्याला होता. आज सकाळी जुवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला प्रसादचा मृतदेह आढळून आला असता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली, पोलिस पुढील तपास करीत आहेत

हेही वाचा : शेवटच्या टप्प्यात सोयाबीनला चांगले भाव मिळतील शेतकऱ्यांना होती अपेक्षा,भाव घसरले, कृषी शास्त्रज्ञचा शेतकऱ्यांना सल्ला

जुवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या शेजारी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी प्रसादचा मृतदेह पडलेला पाहताच नागरिकांनी बदलापूर पूर्व पोलिसांना घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यात दगड घालून क्रूरपणे प्रसादची हत्या करण्यात आली असून.

हेही वाचा : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्राणीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. प्रसादची हत्या कोणत्या कारणावरुन करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून. याप्रकरणी काही वेळातच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहे. चौकशी अंतीच हत्येचा नेमका उलगडा होईल, असे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *