मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता, त्याप्रकरणी महाडेश्वर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला किरीट सोमय्या गेले असता त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. यात किरीट सोमय्या जखमी झाले होती. त्यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग आणला. यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रारही महाडेश्वर यांच्याकडून करण्यात आली. मात्र महाडेश्वर यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खार पोलिसांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली.
हे वाचा : शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख तर अपंगत्व आल्यास १ लाख
किरीट सोमय्या यांनी या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर खार पोलिसांनी तपासानंतर ही कारवाई केल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्या शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात जोरदार वादंग सुरू आहे. शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. तर शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्यावरही शिवसेनेकडून अनेक आरोप करण्यात आले.
हेही वाचा : मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, ठाकरे सरकारची भूमिका
भाजपचं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी कारस्थान सुरू असून. त्यासाठी भाजपने राणा आणि कंगना यांच्यासारखी लोक नेमली आहे. असा आरोप शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांच्याकडून होत आहे. तर किरीट सोमय्या आणि मोहीत कंबोज यांच्यासारखे नेते अशा ठिकाणी मुद्दाम जातात, आणि हल्ला झाल्याचा कंगावा करतात, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या आहे.
तर महाडेश्वरांना अटक करून सोपी कलमं लावून सोडून द्यायचे असेल तर तरी नौटंकी आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावाल आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर गुन्हे लावून महाडिकांमार्फत सोमय्या यांची हत्या करण्याचा कट होता, हे शोधण्याचा प्रयत्न होता का, याचा शोध घेतल्यास या अटकेला अर्थ आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर इतर कुणाला कोणतीही इजा झाली नाही, सोमय्या यांनाच कशा जखमा झाल्या असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्यामुळे या अटकेनंतरही जोरदार राजकारण तापलं आहे.