महाराष्ट्रराजकारण

मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, ठाकरे सरकारची भूमिका

Share Now

गेले काही दिवस महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटलेले आहे. त्या अनुषंगानेच आज महाराष्ट्र सरकारतर्फे भोंग्यांच्या बाबत निर्णय घेण्यसाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. भोंग्यांवर बंदी घालण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे ठाकरे सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा : आईच ठरली मुलाचा काळ, स्वतःच्या पाच महिन्याच्या बाळाचा केला खून

तर या बाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा म्हणजे देशभर त्याची अंमलबजावणी करता येईल असेही राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली असून. महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार नाहीत असे ठाकरे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा

सर्वोच्च न्यायालयाने आवाजाच्या मर्यादे संदर्भात निर्णय दिला आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत भोंगे वाजवले जाऊ नयेत असे न्यायालयाचे निर्देश आहे. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचे काम सरकार करेल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारला फक्त आवाजाच्या मर्यादेच्या बाबत नियमन करण्याचे अधिकार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीवर भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी बहिष्कार घातला. जे आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतात त्यांच्याशी संवाद का करायचा? असा सवाल करत भाजपाने बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *