खा. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक, आजची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार ?
खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच दोघानं खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
हेही वाचा :- आ. रवी राणा यांनी ‘या’ कारणामुळे आंदोलन मागे घेतलं
राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आता उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?