प्रयागराजमध्ये ‘सिरियल किलिंग’, एकाच कुटुंबातील पाच जणांची विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील संगम शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. थरवई पोलीस ठाणे हद्दीतील खेवरजपूर गावात ५ जणांची विटांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर घराला आग लावण्यात आल्याची माहिती आहे. या सामूहिक हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.
या निर्दयी हत्येची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले . प्रयागराजच्या गंगापार भागात सतत संपूर्ण कुटुंबाच्या हत्येच्या घटना घडत आहेत. यूपी पोलिसांसाठी हे मोठे आव्हान बनले आहे. या परिसरात दर चार ते पाच महिन्यांनी अशाच घटना घडतात. रात्रीच्या अंधारात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू होतो.
हेही वाचा :- RSS ने माफी मागावी – एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी
या घटनेत कुटुंबप्रमुख ५५ वर्षीय राजकुमार यादव, ५० वर्षीय पत्नी कुसुम, २५ वर्षीय मुलगी मनीषा यांचाही समावेश आहे. ३० वर्षीय सून सविता आणि दोन वर्षांची निष्पाप नात साक्षी यांचीही हत्या करण्यात आली आहे. प्रदीपकुमार यादव यांनी आपल्या भावजय व इतरांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली होती.
बलात्काराचा संशय आल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृत महिलांचे कपडे अस्ताव्यस्त आढळून आले आहेत. सून आणि मुलीसोबतही बलात्कार झाल्याची शक्यता आहे. पोलीस हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून गावकरी आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.
हेही वाचा :- आ. रवी राणा यांनी ‘या’ कारणामुळे आंदोलन मागे घेतलं
सीरियल किलिंग थांबत नाहीयेत.अशा बहुतांश घटनांमध्ये पोलिसांचे हात रिकामेच असतात. येथे सीरियल किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या शनिवारी याच गंगापार परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही ठिकाणांमध्ये केवळ १५ किलोमीटरचे अंतर आहे.
गेल्या १० वर्षात पोलिसांना काही विशेष करता आले नाही, अशा किमान २० मोठ्या घटना घडल्या आहेत. बहुतांश घटनांमध्ये पोलिसांना विशेष काही करता आलेले नाही. आठवडाभरात एकाच परिसरात संपूर्ण कुटुंबाची हत्या करणे हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे.
हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !