आ. रवी राणा यांनी आंदोलन मागे घेतलं
दोन दिवसापासून राज्याच्या राजकारणात आ.रवी राणा यांचं आंदोलन चर्चेत आहे. मातोश्री समोर हनुमान चाळीसा पठण करणार असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात येत होत, मात्र त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. रवी राणा यांनी सांगितले कि, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :- आमदार खासदार असले म्हणून काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत, असा आरोप करत आम्ही कुणाच्याही दबावात नाही, मी स्वतः आंदोलन मागे घेत आहे. असे त्यांनी सांगितले बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, अशी टीका शिवसैनिकांवर केली.
RSS ने माफी मागावी – एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी
आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठं होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले.