रवी राणा यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री मातोश्रीवर दाखल
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भोंगे आणि हनुमान जयंती पासून हनुमान चालीसा मुद्दा चर्चेत आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा हट्ट धरला आहे. उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असं रवी राणा, म्हणाले यामुळे मातोश्रीवर सकाळपासूनच शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :- नवाब मलिक याना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका
आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली त्यानंतर दुपारी साडेचार वाजता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांचे हात जोडून आणि हात उंचावून आभार देखील मानले. खासदार विनायक राऊत खासदार अनिल देसाई युवासेना सचिव वरून सर्देसाई हेदेखील मातोश्री समोर शिवसैनिकांचे सोबत होते.
हेही वाचा :- विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; स्टेनो झाला असेल नोकरीसाठी करा अर्ज
आ.रवी राणा आणि खा. नवनीत राणा काय म्हणाले…
आज सकाळीच आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दोघीही मुंबईत दाखल झाले असून त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा :- फोन टॅपिंग प्रकरण ; संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ बोगस नावाने फोन टॅपिंग
रवी राणा म्हणाल्या की आम्ही कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत, पोलिसांना देखील सहकार्य करू. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नव्हे शंभर वेळा हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी मिळाली असती. िवाळीच्या आधी शेतकर्यांसाठी आंदोलन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांनी मला मातोश्रीवर जाताना अटक केली आणि तुरुंगात टाकलं. जय श्रीराम बजरंग बली च नाव घेण्यापासून आम्हाला कोणी होऊ शकणार नाही असे रवी राणा म्हणाले.
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये