क्राईम बिट

डॉक्टर महिलेची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या ; कारण ऐकून थक्क व्हाल

Share Now

अमरावती शहरात महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील साई हेल्थ केअर अॅन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज दिवाण यांच्या पत्नी होत्या.डॉ. प्रियंका दिवाण असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. प्रियांका दिवाण या विषारी इंंजेक्शन लाऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

प्रियांका दिवाण यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली, त्यानंतर त्यांचा मृतदेह अकोला वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे प्रियांका दिवाण याच लग्न डॉ पंकज दिवाण सोबत २००९ मध्ये झाले होते मात्र त्यांना मुलंबाळं होत नसल्याने डॉ प्रियांका या तणावात होत्या, याच कारणाने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र प्रियांका यांच्या नातेवाईकांनी पती पंकज दिवाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा :- फोन टॅपिंग प्रकरण ; संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ बोगस नावाने फोन टॅपिंग

मंगळवारी रात्री झोपी गेलेल्या डॉ प्रियांका दिवाण या सकाळी बेडरूम मधून बाहेर आल्याचं नाहीत, तेव्हा डॉ पंकज दिवाण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र बेडरूम मधून त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे त्यांनी बेडरूमचे दार तोडले आणि आता बघताच प्रियांका या मृतवस्तेत होत्या, याची घटनेची माहिती डॉ पंकज दिवाण यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मात्र, महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर आता अकोला वैद्यकीय महाविद्यालयात ५ डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पुढील कारवाईसाठी पोलीस आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या की आत्महत्या, याचे गूढ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच उकलणार आहे

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *