मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी
मुंबई : एका महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.महिलेने पाच कोटींची खंडणी मगितल्याने धनंजय मुंडे यांनी महिलेच्या विरोधात तक्रार दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी तक्रारीत सांगितलं की, “फेब्रुवारी ते मार्च महिन्यात संबंधित महिलेने आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करुन पाच कोटींचं दुकान आणि महागड्या मोबाईल फोनची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास बदनामी करण्याची धमकी दिली होती.”
हेही वाचा :- २३ एप्रिल रोजी रवी राणा “मातोश्री” समोर हनुमान चालीसा पठण करणार
धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोनही कुरिअरद्वारे पाठवला होता. मात्र यानंतरही संबंधित महिला आणखी पाच कोटी रुपयांच्या ऐवजाची मागणी करत होती .
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये
मग मात्र धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर कोणी सीम घेतले का ? जाणून घ्या असे
दरम्यान ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचयाची असल्याचं समजतं. पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवलं असून आता या चौकशीत काय समोर येतं हे पाहावं लागेल.
हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA १३% वाढणार, तीन महिन्यांची थकबाकीसुद्ध