वकील गुणरत्न सदावर्ते यांना जमीन मंजूर, मात्र…

सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला असून. सातारा जिल्हा सत्र न्यायालयना हा जामीन मंजूर केला. मुंबईतील गिरगाव कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बचाव पक्षाचे वकील श्याम प्रसाद बेगमपुरे यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सातारा पोलिसात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा (Read This)  आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?

दरम्यान, सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या पैशातून काही मालमत्ता सदावर्ते यांनी खरेदी केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता. तसेच परळमध्ये ६० लाखांची जागा विकत घेतली असून २३ लाखांची गाडीही खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) फोन टॅपिंगवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

भायखळ्यातही मालमत्ता खरेदी केल्याचे प्रदीप घरत म्हणाले. तर गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे वकिलांनी सांगितले. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काही एसटी कर्मचाऱ्यांनीही त्यांना पैसे दिल्याचे म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *