फोन टॅपिंगवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन समाजकंटक म्हणून टॅप करण्यात आले होते. तपासादरम्यान एसआयडीच्या तत्कालीन पत्रात असे उघड झाले आहे की, एसआयडीने एसीएस होमला त्यांचे फोन टॅप करण्यासाठी दिलेल्या अर्जात राऊत आणि खडसे यांच्याऐवजी दुसरे नाव वापरले होते आणि त्यांना ‘अँटी सोशल एलिमेंट’ म्हटले होते.

हे ही वाचा (Read This) मोठी बातमी : महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाले ?

या सर्व प्रकारावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया अली आहे, राऊत म्हणाले, “नाना पटोले , एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आलं आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता त्या एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे ” असे राऊत म्हणले.

हे ही वाचा (Read This) केळीच्या फांद्यापासून सेंद्रिय खत बनवून नफा कमवू शकतात शेतकरी

दरम्यान, नियमांनुसार, जर खूप आपत्कालीन परिस्थिती असेल, तर अशा परिस्थितीत एसीएस होमच्या परवानगीने पहिले ७ दिवस आणि दुसर्‍यांदा ६० दिवस किंवा त्याहून अधिक किंवा त्यापेक्षा कमी दिवस फोन टॅप केला जाऊ शकतो.मुंबई पोलिसांचा दावा आहे की संजय राऊत यांचा फोन एकदाच टॅप झाला होता, जो जवळपास ६० दिवस टॅपवर ठेवण्यात आला होता. त्याचवेळी खडसेंचा फोन दोनदा टॅपिंगवर ठेवण्यात आला होता.

पहिली वेळ ७ दिवस आणि दुसरी वेळ ६० दिवस. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कुमार यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, एसआयडीच्या स्वरूपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे नाव नव्हते. खडसे किंवा राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचे कोणाला कळू नये म्हणून एसआयडीकडून विनंती चुकीच्या नावाने गेल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *