आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीच्या आत्महत्येचे गूढ उकलणार ?

कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी यांनी आत्महत्येपूर्वी मुलाला पाठवलेल्या अखेरच्या संदेशामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. या संदेशात एका महिलेचा उल्लेख करत, काही बरेवाईट झाल्यास संबंधित महिलेला जबाबदार धरण्याबाबत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, नेहरू नगर पोलिसांनी याला दुजोरा दिला नसून, अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा :- लग्ना आधीच्या प्रियकरासोबत विहिरीत उडी घेऊन केली विवाहितेने आत्महत्या

मंगेश कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीसह आई-वडिलांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले. या अपघातात कुडाळकर आणि त्यांची दोन मुले थोडक्यात बचावली. त्यानंतर त्यांनी कुर्ला परिसरात राहणाऱ्या रजनी यांच्याशी विवाह केला. रजनी यांना पहिल्या पतीपासून दोन मुले होती. त्यांचीही जबाबदारी कुडाळकर यांनी स्वीकारली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रजनी यांचा मुलगा प्रज्वल याचा चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

तर दुसरा मुलगा हर्षल त्यांच्यासोबत राहण्यास होता. पहिल्या मुलाच्या निधनामुळे त्या तणावात होत्या. त्यातच रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलगा हर्षलच्या मोबाईलवर अखेरचा संदेश पाठवलाय. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा हर्षल थेट पोलीस ठाण्यात आला होता.

हे ही वाचा (Read This)  मराठवाड्यात हळदीला मिळतोय विक्रमी दर, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांचा पीक काढणीसाठी जोर

हर्षलला केलेल्या संदेशात एका महिलेचा उल्लेख करण्यात आला आहे. ही महिला त्यांच्या पहिल्या पतीच्या कुटुंबीयांपैकी एक असल्याचेही समजते. पोलीस रजनी यांचा मोबाईल ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *