पाणी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज

पुण्यातील कात्रजमध्ये पाणी प्रश्न पेटला असून. पाणी प्रश्ना बद्दल आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने लाठीचार्ज करावा लागल्याचे पुणे पोलिसांना स्पष्ट केले. कात्रज भागात पाण्यासाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरु होत. सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु होत. पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही कात्रजचा विकास झाला नाही. महापालिकेत समावेश होऊन २५ वर्षे उलटली तरी कात्रजमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. यामुळे स्थानिक नागरिक उपोषणाला बसले आहे.

हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात

लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरवा करुन देखील ते दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते नरेश बाबर यांच्या अध्यक्षतेखाली कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी येथील नागरिक उपोषणाला बसले. कात्रजसह अन्य समाविष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न, वाहतूक समस्यांसह अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी उपोषण सुरु होते. मात्र पोलिसांनी हे उपोषण बंद पाडल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *