पतीनेच पत्नीचा केला खून, मग केला असा बनाव कि पोलीस हि झाले परेशान

पतीने दुसऱ्या पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थान येथील जयपूरमधील प्रताप नगर पोलीस ठाणे परिसरात घडली असून. पाच वर्षांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला. तपासा वेळी ही हत्या त्या महिलेच्या पतीनेच केल्याचे समोर आली.

प्रताप नगर ठाणेप्रभारी बलबीर कासवान यांनी सांगितले, “सोमवारी दुपारी सलमान त्याची दुसरी पत्नी रवीनाला भेटण्यासाठी घरी पोहोचला, त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावर सलमानने रवीनाचा तिच्याच ओढणीने गळा दाबून हत्या केली. या नंतर त्यांनी दीड वर्षाच्या रुहानला घेऊन पोलीस ठाणे गाठले. तेथे त्याने पत्नीची हत्या झाल्याचे सांगितले आणि हत्येचा आरोप मेहुणी आणि पत्नीच्या मावशीच्या पतीवर लावले.”

हेही वाचा : मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार ? यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

सलमानच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथे त्यांना काही खुणाही आढळल्या होत्या. यासोबतच फॉरेन्सिकच्या टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली असता. त्यांना सलमानच्या मेहुणी सीकरमध्ये असल्याचे कळाले. तसेच त्याचा मावस सासराही तिथेच होता. एकूण घटनाक्रम पाहिल्यानंतर संशयाची सुई सलमानकडे वळाली होती.

हेही वाचा : डॉक्टरने दिली नर्सच्या मोबाईल चोरीची सुपारी

याच दरम्यान, रवीनाची आई आणि अन्य नातेवाईकांचीही चौकशी करण्यात असता. चौकशी दरम्यान सलमान आणि रवीनामध्ये वाद होते आणि याचमुळे ते वेगळे राहत असल्याचे समोर आले. याचवेळी रवीनाच्या नातेवाईकांनी सलमानवर हत्येचा आरोप केला. पोलिसांनी सलमानची चौकशी केली असता तो वारंवार आपला जबाब बदलू लागला. म्हणून अशा स्थितीत त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता

पाच वर्षांपूर्वी सलमानने त्याची गर्लफ्रेंड रवीना बानोसोबत दुसरे लग्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. लग्नानंतर सलमानसोबत विभक्त झाल्याने रवीना तिची आई बबली आणि बहीण आलियासोबत प्रताप नगरमध्ये राहत असे. त्याचवेळी सलमान त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सांगानेर येथे राहत होता. पोलिसांनी निरागस बालक रुहानला त्याच्या आजीच्या ताब्यात दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *