मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बाढ करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या पत्राकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे राज यांना आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :- राज्यातील ‘या’ शहरात लाखोंची बनावट दारू जप्त

राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. काही महिन्यांपूर्वी त्यात कपात करून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून, त्यांना ड्रोड सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता. या अहवालाकडे दुर्लक्ष करत, सरकारने उलटसुरक्षेत कपात केल्याचा आरोप मनसेने केला आहे. राज यांनी मशिदीवरील भौग्यांविरोधात भूमिका ने पीएफआय या संघटनेने त्यांना धमकी दिली होती, अन्य काही धार्मिक संघटनानीही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

अमित शहांना पत्र लिहिणार

राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रणौत, भाजप नेते किरीट सोमय्या, खा.नवनीत राणा यांना सुरक्षा दिली. विशेषतः महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्यांना केंद्राने स्वतःचे सुरक्षाकवच बहाल केले आहे. सध्या राज ठाकरे यांनी मविजा सरकारच्या विरोधात सूर आळवले आहेत. ते लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौयादरम्यान त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे समजते

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *