वकील गुणरत्न सादवार्तेनां १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर त्यांच्या पत्नीवर हि गंभीर आरोप
पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय असून. त्याचबरोबर जयश्री पाटील यांना सहआरोपी केले. कट रचणे, आरोपींना प्रोत्साहन देण्याचा जयश्री पाटील यांच्यावर आरोप असल्याचं प्रदीप घरत यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी बेताल वक्तव्य केल्या प्रकणी तो गुन्हा आहे. तेढ निर्माण होईल असं वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही असे तक्रारदराने सांगितले . यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा आता सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची ७ दिवसांची कोठडी मागितली होती. तर पोलीस कोठडीची आता काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद देखील सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आले असून. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाचे लक्षात असून दिले. खासकरून एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली, असा आरोप करण्यात आलाय. तसेच ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा मोठा सहभाग असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाला संगितले आहे