वीज चोरीसाठी महिलेने लढवली शक्कल, महावितरणला दोन लाखाचा गंडा

वीज बिलापासून सुटका मिळवण्यासाठी परभणीमध्ये एका महिलेने शक्कल लढवून मीटरमध्ये छेडछाड करत महावितरणला तब्बल दोन लाखांचा चुना लावला. या प्रकरणी आरोपी विरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंगला परसकुमार जैन असं गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे.

वीजेचा वापर केल्यानंतर महावितरणाकडून देण्यात येणारे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकजण वेगळी शक्कल लढवतात. मात्र, परभणी शहरातील सद्गुरु नगरमधील मंगला पारसकुमार जैन यांनी छेडछाड करुन मीटर बंद केले. सद्यस्थितीला महावितरणकडून ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरची तपासणी केली असता मंगलान जैन यांनी मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केले असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे निर्दशनास आले.

मीटर बंद करून मंगला जैन यांनी दोन लाख दोनशे रुपयाचे वीजचोरी केली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी महावितरणच्या परभणी शहर विभागाच्या सहाय्यक अभियंता रूपाली वसंतराव जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगला जैन यांच्या विरोधात नानलपेठ ठाण्यामध्ये विद्युत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचे समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *