दोन वर्षानंतर पंढरीची वारी ; पायी वारीचा सोहळा ‘या’ तारखेपासून
गेल्या दोन वर्षापासून आषाढीवारीला खंड पडला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांने हि परंपरा कायम राखली. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला , म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्यानं वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.
यंदा पायी वर २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करणार आहे.
दि. २२ आणि २३ जूनला पुणे ,
दि. २४ आणि २५ जूनला सासवड
दि. २६ जूनला जेजुरी
दि. २७ रोजी वाल्हे,
दि. २८, २९ जून रोजी लोणंद,
दि. ३० जून तरडगांव
दि. १ आणि शनिवार दिनांक २ जुलै रोजी फलटण
दि. ३ जुलै बरड
दि. ४ जुलै नातेपुते
दि. ५ जुलै माळशिरस
दि. ६ जुलै वेळापूर
दि. ८ जुलै भंडीशेगाव
शनिवार दिनांक ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.
मागील दोन वर्ष पालखी सोहळा मोजक्या वारकऱ्याच्या उपस्तितीत पार पडला मात्र यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा होणार आहे. यासाठी नियोजन देखील त्या पद्धतीने करण्यात आले आहे. यंदा नोंदणीकृत जवळपास ४०० दिंड्या येतील अशी माहिती. ऍड विकास ढगे यांनी दिली आहे