औरंगाबादमधील ‘त्या’ कीर्तनकार महिला आणि पुरुष दोघांवर देखील गुन्हा दाखल
कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आहेत, तसेच सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला कीर्तनकार यांचा गेल्या २ दिवसा पासून एक व्हिडीओ नको त्या स्थितीत व्हायरल होत आहे. विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते आहे. चित्रफितीतील पुरुषाला एक विवाहित मुलगीसुद्धा आहे. हॉटेलवर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना सदरील व्हिडिओ त्यानेच बनवल्याचे दिसत आहे. २ मिनिटे ५४ सेकंदांच्या या चित्रफितीत दोघेही ठळकपणे दिसत आहेत.
या प्रकरणी अखेर वैजापूरच्या त्या कीर्तनकारासह महिलेविरोधातही धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून पुरुष कीर्तनकार याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणी समाज सेविका तृप्ती देसाई यानो देखील प्रतिक्रिया दिली आहे, त्या म्हणाल्या की,‘माझ्यामते हा व्हिडीओ जाणीवपूर्वक चित्रित करण्यात आला आहे.’ तसेच कीर्तनकारांना लोकं देवासमान मानतात, त्यांचे लोकं दर्शन घेत असतात पण अशा प्रकारच्या कृत्यांमुळे वारकरी संप्रदायाचेही नाव खराब होते. त्यामुले अशा कीर्तनकारांची पदवी काढून घेऊन त्यांच्या कीर्तनावर बंदी आणायला हवी, असेही तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या