मनसेनं शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा पठण केलं..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात मशिदी वरच्या भोग्यावर बंदी घालण्यात यावी, असं वक्तव्य केलं होतं त्यासोबतच भोंगे काढले नाही तर त्यापेक्षा डबल आवाजात आम्ही हनुमान चालीसा वाजवु अशी चेतावणी देखील त्यांनी दिली होती.यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले.
आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं आहे. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मनसेनं थेट शिवसेनाभवनासमोरच हनुमान चालिसा पठण केलं. पोलिसांनी नंतर मनसैनिकांवर कारवाई केली आहे.
शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का केली ?
अशी टीका मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली.
संदीप देशपांडे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पध्दतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का ?