महाराष्ट्र

२१ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा मान कोल्हापूरला ; पैलवान पृथ्वीराज पाटील जिंकला

Share Now

महाराष्ट्रात सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी आज पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने ५-४ च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला पराभूत केलं आहे . यंदाच्या स्पर्धेत तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकला होता .

मागील दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धाही घेण्यात आली नाही . या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली. यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता किताबाच्या कुस्तीची वेळही जवळ आली आहे. आज म्हणजेच ९ एप्रिलला महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती मॅटवर रंगली. या कुस्तीत खुल्या म्हणजे ८६ ते १२५ किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने होते.

हेही वाचा :- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी १ कोटी ४१ लाखाचे दागिने चोरीला

पैलवान पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूरच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान असून , कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *