Uncategorized

प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

Share Now

मुंबई :- मुंबै बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची ‘मजूर’ प्रवर्गातून झालेली निवड अपात्र ठरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एमआरए पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना आज नोटीस बजावली आहे.

प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याने नोटीस बजावली असून, ११ एप्रिलला सकाळी ११ वाजता हजर राहा असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

हे हि वाचा :- रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

आम आदमी पक्षाची धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी चार एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा :- INS Vikrant – किरीट सोमय्या नील सोमय्या चौकशीला गैरहजर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *