INS Vikrant – किरीट सोमय्या नील सोमय्या चौकशीला गैरहजर
लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान राबवत. या अभियानातून सामान्य जनतेकडून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केला, असा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर आहे.
याप्रकरणी सोमय्या पितापुत्र अडचणीत आले आहे, आज त्यांना मुंबईत ट्रोम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आले होते, मात्र दोघेही आज चौकशीला येणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली आहे.
गैरहजर राहण्याचे कारण काय
किरीट सोमय्या आणि निल सोमय्या याना FRI ची प्रत आज मिळाली आहे , तसेच दिल्ली दौरा नियोजित असल्याने आज चौकशी साठी येणार नाहीत अशी माहिती वकिलांनी दिली आहे. १३ एप्रिल नंतर सोमय्या चौकशीला हजर राहणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला नाही. आम्ही राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागवली होती. पण, त्यात हा निधी जमा झाला नाही, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. किरीट सोमय्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांहून निधी गोळा केला होता. जवळपास ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. या प्रकरणात इतर भाजप नेत्यांचा समावेश आहे. यात किरीट सोमय्या हे मुख्य सूत्रधार आहेत. असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.